VIDEO: बघा प्रशिक्षकपदी पुन्हा निवड झाल्यानंतर काय बोलले रवी शास्त्री !

0

मुंबई : भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी पुन्हा रवी शास्त्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कपिल देव अध्यक्ष असलेल्या त्रिसदस्यीय समितीने काल रवी शास्त्रींच्या नावाची घोषणा केली. दरम्यान निवड झाल्यानंतर रवी शास्त्री यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. बीसीसीआयने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला.

‘कपिल, शांता आणि अंशुमन यांच्या क्रिकेट सल्लागार समितीचे मी आभार मानतो. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि पुढील 26 महिन्यांसाठी मुख्य प्रशिक्षकपदावर मला कायम ठेवले. या संघाचे प्रशिक्षकपद भूषविणे हे मी माझे भाग्य समजतो. या संघावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. फार कमी संघांना तसे जमते. गेली तीनेक वर्ष हा संघ सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे’, असे रवी शास्त्री यांनी म्हटले आहे.

शास्त्री यांच्यासह प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत न्यूझीलंडचे माईक हेसन, ऑस्ट्रेलियाचे टॉम मुडी आणि भारताचे रॉबीन सिंग व लालचंद राजपुत हेही होते. वेस्ट इंडिजच्या फिल सिमन्सने मुलाखतीपूर्वीच वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली.