सोलापूर पुणे मार्गावर रात्री झाला अपघात: डिक्की तोडून दिले एकाला जिवदान
पुणे :- शेतकरी सन्मान यात्रेचा समारोप आटोपून पुण्याकडे येत असताना सोलापूर – पूणे महामार्गावर बुधवारी रात्री झालेल्या एका खाजगी पटेल ट्रॅव्हल्सच्या अपघातातील जखमींना स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिवाची पर्वा न करता रात्रीच्या अंधारात तातडीची मदत मिळवून दिली. विशेष म्हणजे पहारीने डिक्की फोडून अडकलेल्या एका प्रवाशाला जिवदान दिले. ही घटना 10 मे च्या सकाळी 3 वाजता घडली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काढलेल्या शेतकरी सन्मान यात्रेचा समारोप 9 मे रोजी उस्मानाबाद जिल्हयातील शिराढोण येथे झाला. समारोपीय कार्यक्रम आटोपल्यानंतर खा. राजू शेट्टी हे कोल्हापूरला गेले तर स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर हे पुण्याकडे निघाले होते. त्यांच्या वाहनाच्या समोर एक खाजगी प्रवासी वाहतुक करणारी ट्रॅव्हल्स् क्र एम.एच.12 के.क्यु. 4005 ही प्रवासी घेवून चालली होती. सोलापूर पुणे मार्गावर डाळज – 3 गावाजवळ भिगवन नजीक ट्रॅव्हल्सच्या चालकाला डुलकी लागल्याने त्याचा वाहनावरील ताबा सुटला व ट्रॅव्हल्स् थेट उसाच्या शेतात जावून अर्धवट पलटी झाली. या अपघातात दोन लहान मुली जागीच ठार झाल्या तर ट्रॅव्हल्समधील अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघात होताच रात्रीच्या काळोखात प्रवाशांनी एकच हल्लाकल्लोळ केला. तितक्याच रात्री या ट्रॅव्हल्सच्या मागे रविकांत तुपकर यांची इनोव्हा गाडी येत होती. ट्रॅव्हल्सला अपघात झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या ड्राव्हरला गाडी थांबवयाला सांगीतले. व आपल्या गाडीतील सहकारी स्वाभिमानी विदयार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अमोल हिप्परगे, ऋषीकेश डुचे व विनोद हिवाळे यांना सोबत घेवून तातडीने जखमींना बाहेर काढले व रस्याश्वरून जाणाऱ्या वाहनांना थांबवून जखमी प्रवाशांना नजीकच्या रूग्णालयात उपचारासाठी रवाना केले. रविकांत तुपकर यांनी लगेच पोलिसांना फोन करून अपघाताची माहिती दिली. पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी येवून मदत केली. काही प्रवाशांना जागेवरच प्रथमोपचार करण्यात आले तर गंभीर जखमींना रुग्णालयात पाठविले. सकाळी 3 वाजता झालेल्या या अपघातातील जखमींना सकाळी 6 वाजेपर्यंत रविकांत तुपकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मदत केली. विशेष म्हणजे आपण कोण आहोत याबददल रविकांत तुपकर यांनी ओळख दिली नाही. मात्र तुपकरांचे धाडस पाहून मदतीसाठी धावून आलेल्या या भागातील काही तरुणांनी रविकांत तुपकरांना ओळखले व सकाळपर्यत या अपघातातील जखमींना मदत केली. विशेष म्हणजे पोलिस व्हॅन हेलपर सलमान पठाण् या तरूणाने अपघातग्रस्तांना काढण्यासाठी विशेष् मदत केली.
आणि डिक्कीत अडकलेल्या प्रवाशाला मिळाले जिवदान
सध्या लग्नसराईचा हंगाम असल्यामुळे सर्वच वाहने फुल्ल् आहेत. प्रवाशी सुध्दा जोखीम पत्करून मिळेल त्या पध्दतीचा प्रवास करून आपल्या इच्छीत स्थळी पोहचण्याचा प्रयत्न् करीत असतात. असाच प्रकार या पटेल ट्रॅव्हल्समधून दिसून आला. गाडीत जागा नसल्यामुळे एक प्रवाशी चक्क् ट्रॅव्हल्सच्या डिक्कीत बसून प्रवास करीत होता. गाडीचा अपघात झाला तेव्हा हा प्रवासी जोरजोराने ओरडत होता. मात्र त्याच्याकडे कुणाचेच लक्ष नव्हते. उसाच्या शेतात गाडी पलटी झाल्यामुळे त्याला ऑक्सीजन सुध्दा मिळत नव्हता. ही बाब तुपकर यांच्या लक्षात आली त्यांनी नजीकच्या शेतकऱ्याकडून पहार मागवली व गाडीच्या डिक्कीचा दरवाजा तोडला व त्या प्रवाशाला बाहेर काढले. ओमप्रकाश निंबराज लांडगे असे त्या प्रवाशाचे नाव होते. तो रामेगाव ता. औसा जि. लातूर येथील रहीवासी होता. रविकांत तुपकर यांनी दाखविलेल्या धाडसामुळे व तत्परतेमुळे या प्रवाशाला जिवदान तर मिळालेच पण तुपकरांच्या संवेदनशिलतेचा प्रत्य्यही उपस्थितांना आला.