मुंबई: गृहकर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने गृहकर्ज मर्यादा वाढविण्याचे निर्देश बँकांना दिले आहे. आरबीआयच्या निर्देशानुसार महागरीय (दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या) क्षेत्रात गृहकर्जाची मर्यादा ३५ लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. तर इतर क्षेत्रात ही मर्यादा २५ लाखांपर्यंत करण्यात आली आहे.