मुंबई- भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट आणि बँक रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. ६.५ टक्के रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट ६.२५ टक्के आणि बँक रेट ६.७५ टक्के कायम ठेवला आहे. २०१९-२० मध्ये जीडीपी ७.४ टक्के राहिल असा अंदाज आहे. २०१८-१९ च्या दुसऱ्या सत्रात महागाई दर २.७ ते ३.२ टक्के राहिल असा अंदाज आरबीआयने व्यक्त केला.
नुकतेच जीडीपीची आकडे समोर आले. त्यामध्ये जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत जीडीपीमध्ये ७.१ टक्क्यापर्यंत घसरण झाली. त्याआधीच्या तिमाहीत जीडीपी ८.२ टक्के होता. यावर्षात आरबीआयने आतापर्यंत दोनदा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. आरबीआयच्या या निर्णयानंतर सेन्सेक्समध्ये काही अंकांची घसरण झाली. अर्थतज्ञांनी आरबीआयच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.