ही निवडणूक लोकशाहीचा अस्तित्वासाठी: प्रियांका गांधी

0

नवी दिल्ली: भाजप सत्तेवर आल्यापासून आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशातील नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागला आहे. देशाची लोकशाही वाचवणे महत्त्वाचे असून त्यासाठीच ही लढाई लढली जात आहे, असे सांगत, आता भाजप सत्तेतून जाईल असा विश्वास काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी व्यक्त केला.

प्रियांका गांधी यांनी पती रॉबर्ट वाड्रा यांच्यासोबत लोदी इस्टेट येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. १५ लाख रुपये देण्याचे आणि रोजगार देण्याचे आश्वासन दिले. त्यावर ते आता बोलत सुद्धा नाहीत. या मुद्दयावर बोलायचे सोडून ते भलत्याच विषयावर बोलत आहेत, अशी टीका प्रियांका गांधींनी केली.