तब्बल १२ हजार महिलांनी बांधल्या एका पोलीस अधिकाऱ्यास राख्या

0

मुंबई-काल सर्वत्र रक्षाबंधन हा सण उत्साहात साजरा करण्यात झाला. सेलिब्रिटी, राजकारणी यांनी साजरा केलेली रक्षाबंधनाची बातमी पहिली असाल, मात्र मुंबई पोलिसातील एका पोलीस अधिकाऱ्यास तब्बल १२ हजार महिलांनी राख्या बांधल्याचे फोटो कालपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलीस हेच आपले खरे संरक्षक असल्याच्या भावनेने महिलांनी राख्या बांधल्या.

मुंबई पोलिसातील पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना १२ हजार महिलांनी राखी बांधल्याचा फोटो कालपासून सोशल मीडियावर झळकतो आहे.