उपप्रादेशिक अधिकाऱ्यांच्या पगारातून विज बिल वसूल करा

जळगाव l तक्रार करतो की जळगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री श्याम शिवाजीराव लोही यांचे दालनात वातानुकूलित यंत्र (AC) शासनाची कोणतीही परवानगी नसतानाही आपल्या दालनात वातानुकूलित यंत्र बसवले आहे.

सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक शाकाजा-१०२२/प्र.क्र.१३/२२ दि. २५/ ०५/२०२२ या प्रमाणे ज्या उच्च अधिकाऱ्याची ७ व्या वेतन आयोग नुसार वेतनश्रेणी वेतन स्तर रूपये १४४२०० – २१८२०० व त्या पेक्षा अधिक आहे अशा अधिकाऱ्यांना आपले दालनात वातानुकूलित यंत्र (AC) बसवावे असे आदेश असतानाही जळगावचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. श्याम शिवाजीराव लोही यांचे वेतन श्रेणी हे शासनाच्या नियमानुसार कमी आहे ? तरी त्यानी आपल्या दालनात वातानुकूलित यंत्र बसवले आहे. मी केलेल्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन चौकशी करण्यात यावी व तात्काळ वातानुकूलीत यंत्र ७ (सात) दिवसात हटविण्यात यावे. तसेच वातानुकूलित यंत्र बसवले पासुन ते आज पर्यन्त साईट बिल उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम शिवाजीराव लोही यांचे पगारतून वसूल करण्यात यावे.