नंदुरबार प्रतिनिधी ।
जिल्हा परिषद, नंदुरबार
यांनी दिली. शासनामार्फत स्वातंत्र्याच्या
जिल्हा परिषदेच्या गट क संवर्गातील पेसा क्षेत्र व नॉन पेसा क्षेत्राकरिता ४८८ रिक्त पदे भरण्याकरिता लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) अमृतमहोत्सवी वर्षांत अंदाजे ७५ हजार सरळसेवा कोट्यातील पदे १५ ऑगस्ट २०२३ पूर्वी भरावयाची आहेत. त्यात नंदुरबार जिल्हा परिषदेंतर्गत गट क संवर्गातील अनुसूचित क्षेत्राबाहेरील (नॉन पेसा) आरोग्यसेवक (पुरुष / महिला) औषधनिर्माण अधिकारी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपिक / लेखा) पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा वैज्ञानिक येणार आहे.
अधिकारी, विस्ताराधिकारी (कृषी), विस्ताराधिकारी (शिक्षण), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, पर्यवेक्षिका, कनिष्ठ अभियंता या पदांचा समावेश असेल. अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) आरोग्यसेवक (पुरुष / महिला), कंत्राटी ग्रामसेवक, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक या संवर्गाचा पदभरतीचा कालबद्ध कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात आला असून, या पदाची जाहिरात राज्यात एकाच वेळी प्रसिद्ध होणार आहे. पदभरतीकरिता शासनस्तरावरून दोन कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील ४८८ रिक्त पदे भरण्यासाठी आयबीपीएस कंपनीची निवड करण्यात आली असून, पदभरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे.