नवी दिल्ली: जम्मू-काश्मीर राज्याला असलेला स्वतंत्र राज्याचा दर्जा कलम ३७० रद्द करून काढून घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर तेथील काही नेत्यांना अटक करण्यात आलेली आहे. अटक करण्यात आलेल्या नेत्यांची सुटका करण्यात यावी या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर देशातील प्रमुख विरोधी पक्षाचे नेते आंदोलनाला बसले आहे. कॉंग्रेस, डीएमके, आरजेडी, सीपीआय, समाजवादी पार्टीच्या नेत्यांचा यात समावेश आहे.
कॉंग्रेसचे गुलाम नबी आझाद, कार्ती चिदंबरम, सीपीआयचे सीताराम येचुरी, आरजेडीचे मनोज झा आदी नेते याठिकाणी उपस्थित आहेत.