मुंबई-बॉलीवूडमधील संस्कारी बाबू अलोक नाथ यांच्यावर प्रसिध्द तारा मालिकेच्या लेखिका-निर्मात्या विनता नंदा यांनी बलात्काराचे आरोप केले होते. ओशिवरा पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान अटकपूर्व जामिनावर आज दिंडोशी सत्र न्यायालय सुनावणी पार पडली. न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
ओशिवरा पोलीस आलोकनाथ यांना अटक करू शकत नाहीत. या मोहिमेअंतर्गत हे प्रकरण पुढे आले होते. या पार्श्वभूमीवर अटक टाळण्यासाठी आलोकनाथांनी अटकपूर्व जामीन अर्ज दिंडोशी सत्र न्यायालयात दाखल केला होता. आलोकनाथ यांच्यावर कलम ३७६ नुसार बलात्काराचा गुन्हा दाखल आहे.