२६/११ तील शहीद जवानांना नेटकरी व मान्यवरांकडून श्रद्धांजली !

0

मुंबई- मुंबईतील दहशतवादी हल्ल्यास आज दहा वर्षे पूर्ण होत आहे. आजच्या दिवसी दहावर्षापूर्वी २६ नोव्हेंबरला हा भ्याड हल्ला झाला होता. पाकिस्तानातील लष्कर ए तोयबा या संघटनेच्या १० दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १६६ जण ठार झाले होते. त्या वेळी इतर ९ दहशतवादी मारले गेले तर अजमल कसाब हा जिवंत सापडला होता. नंतर त्याला भारतीय न्यायालयाच्या आदेशानुसार फाशी देण्यात आली. आज दहा वर्षांनंतरही या हल्ल्याच्या जखमा ताज्या आहेत. आज सकाळपासूनच नेटकरी सोशल नेटवर्किंग साईट्सवरून या हल्ल्यात बळी गेलेल्या तसेच मुंबईच्या संरक्षणासाठी शहीद झालेल्यांना आदरांजली अर्पण करता, त्या दिवसाच्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहेत.

#Remembering26/11 हे हॅशटॅग आज ट्रेण्ड झाले आहे. अगदी सामन्यांपासून बड्या नेत्यांनीही हे हॅशटॅग वापरून २६ नोव्हेंबरच्या हल्ल्यासंदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरवरून श्रद्धांजली वाहिली आहे. या हल्ल्यात बळी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंब माझ्या संवेदना आहेत. या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस व सुरक्षा दलातील प्रत्येकास आम्ही नमन करतो. भारत देश न्याय हक्कांच्या संरक्षणासाठी व दहशतवादाच्या उच्चाटनासाठी वचनबद्ध आहे असे म्हटले आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील श्रद्धांजली अर्पण करत कुटुंबीयांसोबत असल्याचे आश्वासन दिले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 26/11च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईची सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. आज संपूर्ण मुंबई सीसीटीव्हीच्या कठोर निगराणीत आहे. दहशतवादाविरोधातील लढा आणखी तीव्र करण्याचा प्रत्येक देशवासियाचा निर्धार आहे असे म्हटले आहे.

मुंबई पोलिसांनी देखील श्रद्धांजली अर्पण केली आहे.