नवी दिल्ली- आयडीआय बँकेचे सीईओ महेश कुमार जैन यांची रिझर्व्ह बँकेच्या डेप्यूटी गवर्नरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जैन यांचा कार्यकाळ तीन वर्ष असणार आहे. ही माहिती फाइनेंशियल सर्विसेज सेक्रेटरी राजीव कुमार यांनी ट्वीटद्वारे दिली. जैन यांना २ लाख २५ हजार रुपये वेतन आणि इतर भत्ते मिळणार आहे. महेश कुमार जैन एस.एस.मुंद्रा यांच्या जागी नियुक्त होणार आहे. यापूर्वी महेश कुमार जैन इंडियन बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ राहिलेले आहे. महेश कुमार जैन यांना बँकिंग क्षेत्रातील ३० वर्षापेक्षा अधिक अनुभव आहे.