बारामतीमध्ये शरद पवार यांच्या निवासस्थानासमोर मराठा समाजाचा ठिय्या

0

आंदोलनात अजित पवारांचाही सहभाग
बारामती । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानासमोर गुरुवारी सकाळी मराठा कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. आंदोलनात राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार हे देखील सहभागी झाले होते. यावेळी अजित पवारांनी आंदोलकांसमवेत सरकार विरोधात घोषणाही दिल्या.