बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या होणार जाहीर

0

मुंबई :- उद्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल दुपारी १ पासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन पाहता येणार आहे.

फेब्रुवारी- मार्च २०१८ मध्ये नऊ विभागीय मंडळांमध्ये सुमारे दोन हजार ८२२ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. सुमारे १४ लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. राज्यातील बारावी आणि दहावीचा निकाल कधी जाहीर होणार, याकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष होते. अखेर बोर्डाने मंगळवारी दुपारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे निकालाची तारीख आणि वेळ जाहीर केली. बुधवारी दुपारी एक वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल जाहीर होणार आहे.

या संकेतस्थळावर हा निकाल पहायला मिळणार आहे.
1. www.mahresult.nic.in
2. www.result.mkcl.org
3. www.maharshtraeducation.com
4.Http://www.knowyouerresult.com
5. hscresult.mkcl.org
6.http://jagranjosh.com
7. www.bhaskar.com