रावेर- नायब तहसीलदार असतांना सर्व-सामान्यांना न्याय देऊन त्यांची कामे तत्काळ केली. पदाधिकारी, सामान्य जनता यांच्याही समस्यांचे निवारण केल्याने ते लोकाभिमुक अधिकारी झाले आहेत, सेवानिवृत्ती नंतरही त्यांनी समाजहितासाठी झटावे, असे प्रतिपादन माजी आमदार अरुण पाटील यांनी येथे केले. तहसीलमधील नायब तहसीलदार सी.एच.पाटील यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी माजी आमदार शिरीष चौधरी, जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, नायब तहसीलदार कविता देशमुख, वनक्षेत्रपाल आर.जी.राणे, शिवाजीराव पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पाटील, डॉ.एस.आर.पाटील, नगरसेवक प्रल्हाद महाजन, दिलीप पाटील, राजू पाटील, अॅड.सुरज चौधरी, डॉ.बी.बी.बारेला, आत्माराम कोळी, शीतल पाटील, डॉ.चंद्रदीप पाटील, वसंतराव महाजन, अनिल अग्रवाल आदी उपस्थित होते
लोकांना दिला न्याय -पाटील
महसूल विभागात काम करतांना सर्व स्तरातील लोकांशी संपर्क आला. गरीब श्रीमंत असा भेदा-भेद कधी केला नाही, त्यांची कामे मनापासून करण्याचा मी प्रयत्न केला. काम झाल्याने त्यांच्या चेहर्यावरील समाधान बघून मला प्रामाणिक काम करण्याची प्रेरणा मिळाली. मी महसूल विभागात लिपिक, मंडळाधिकारी, करमणूक कर अधिकारी, पुरवठा अधिकारी आणि आता नायब तहसीलदार म्हणुन सेवानिवृत्त होत आहे. माझ्या 35 वर्षाच्या सेवेत कधीही कोणावर अन्याय केला नसल्याचे सी.एच.पाटील यांनी सांगितले.