मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
जळगाव :- प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील महसूल कर्मचार्यांनी आज लाक्षणिक संप केला. या संपात जिल्ह्यातील १५०० हून अधिक कर्मचार्यांनी सहभाग घेतला. तसेच संपामुळे आज देखिल जिल्हाधिकारी कार्यालयात सामसूम होती.
प्रलंबित मागण्यांसाठी महसूल कर्मचारी संघटनेतर्फे आंदोलनाचे विविध टप्पे करण्यात आले आहे. आज जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचार्यांनी लाक्षणिक संप पुकारला होता. या संपात जिल्ह्यातील १५०० हून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. तत्पूर्वी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने व घोषणा देण्यात आल्या.
या आंदोलनात जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष शैलेश परदेशी, जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष योगेश नन्नवरे, उपाध्यक्षच रविंद्र माळी, कोषाध्यक्ष सुयोग कुलकर्णी, दिनकर मराठे, मार्गदर्शक देवेंद्र चंदनकर, सुधीर सोनवणे, देवीदास अडकमोल, नूर शेख, सुरेश महाले तसेच महिला प्रतिनिधी प्रिया देवळे, रेखा चंदनकर, गिता शिंदे, सुनंदा पाटील, रेखा कुलकर्णी अमित दुसाने तसेच महिला प्रतिनिधी नम्रता नेवे, मंदाकिनी सुर्यवंशी, शिल्पा सागर, मनोरे तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयाचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्ह्यातून प्रतिसाद
महसूल कर्मचार्यांच्या आजच्या लाक्षणिक संपाला जिल्हाभरातील कर्मचार्यांनी सहभागी होत उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. कर्मचार्यांनी तहसीलस्तरावर देखिल आंदोलन केले.