चोपडा (प्रतिनिधी)
१ ते ८ ऑगस्ट या दरम्यान तहसील कार्यालय मार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत…
एक ऑगस्ट २०२३ रोजी तहसील कार्यालयाचे सभागृहात आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाचे कलम १५५ नुसार पारित झालेल्या आदेशानुसार ३८ खातेदारांना सातबारा व फेरफार वाटप करण्यात आले,
सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या सातबारा संदर्भात लेखन प्रमाद अर्थात किरकोळ चुका असल्यास संबंधित तलाठी यांच्याकडे संपर्क साधून तहसीलदारांचे आदेशानुसार सप्ताह मध्ये योग्य दुरुस्ती करून घ्यावी असे देखील आवाहन करण्यात आले…
उपस्थित शेतकऱ्यांना ई हक्क प्रणाली बाबत मार्गदर्शन करण्यात आले, शेतकऱ्यांनी आता फेरफार साठी तलाठी कार्यालयात जाण्याची आवश्यकता नसून जवळच्या ई सेवा केंद्र, सुविधा केंद्र किंवा स्वतःच्या लॅपटॉप मोबाईल वरून ई हक्क ॲप डाऊनलोड करून घ्यावे आणि आवश्यकतेनुसार बोजा चढविणे, बोजा कमी करणे, वारस कारवाई इत्यादी प्रकारचे फेरफार मंजुरीसाठी दाखल करावे जेणेकरून लवकरात लवकर तलाठी यांची मंजुरी घेऊन आपापली कामे मार्गी लावता येतील…
तसेच सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकरी यांनी ई पीकपाहणी करणे अत्यावश्यक असून शासनाचे अनुदान मिळवणे तसेच शेतमालाची विक्री यासाठी असा ई पीकपाहणी केलेला सातबारा शेतकऱ्यांना उपयोगी पडणार आहे…
तसेच यावेळी तालुका स्तरावरील उत्कृष्ट अधिकारी/ कर्मचारी पुरस्कार वितरण प्रशस्तीपत्रक देऊन करण्यात आले आणि महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या विविध क्षेत्रातील गुणवंत आणि नैपुण्य प्राप्त पाल्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले…
पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांमध्ये सचिन बांबळे ना. तहसीलदार,
मंडळ अधिकारी रवींद्र माळी व रविंद्र महाजन, अव्वल कारकून अरुण वसावे व पंकज शिंपी,
तलाठी .ईक्बाल तडवी, तलाठी अमीन तडवी, महसूल सहायक महेश पानगंटीवार व कपिल चौधरी,
वाहन चालक उमेश तळेकर, शिपाई भरत चौधरी, कोतवाल जितेंद्र धनगर व विकास पाटील यांचा समावेश आहे…