नवी दिल्ली – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) २८ मे ते ३१ मेदरम्यान मोदी सरकारच्या नेत्रृत्वाखालील केंद्र सरकारच्या चारवर्षांच्या कार्यकाळाचा आढावा घेणार आहे. आरएसएसने म्हटल्याप्रमाणे, सरकार अनेक स्तरावर अपयशी ठरत आहे. यासंदर्भात होणाऱ्या बैठकीत आरएसएसचे नेते दत्तात्रय होसबळे आणि कृष्णा गोपाल हे उपस्थित राहणार आहेत. तर भाजप अध्यक्ष अमित शाह आणि राम लाल हे भाजपच्या वतीने या बैठकीला उपस्थित राहतील.
या बैठकीत सरकारच्या विविध मंत्रालयाच्या कामकाजावर रोज चर्चा हेईल. यानंतर काय करणे आवश्यक आहे आणि काय नाही यासंदर्भात अहवाल तयार केला जाईल. चार दिवसांपैकी एका दिवशी, आर्थिक विषयांवर चर्चा होईल. यात अर्थमंत्रालयाचे नेते उपस्थित असतील. यावेळी रोजकार आणि माहागाई या विषयांवर चर्चा हेईल. याच पद्दतीने वेगवेगळ्या सत्रांत शिक्षण, विदेश नीती आणि सुरक्षा विषयांवरही चर्चा होईल. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहदेखील या बैठकीत भाग घेणार आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्व मंत्रालयांचा एक रोड मॅपही तयार केला जाईल.