नवी दिल्ली: मोदी सरकारवर या पाचवर्षात भष्ट्राचाराचा एकमेव आरोप झाला तो राफेलवरून. राफेल प्रकरणी भाजप आणि मोदींवर विशेष टीका करण्यात आली. या निवडणुकीत देखील राफेलचा विषय अधिकच गाजला. दरम्यान आज कायदेतज्ञ प्रशांत भूषण यांच्यासह इतर याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिकेवर लेखी म्हणणे सादर केले आहे.
सुप्रीम कोर्टाने सुरुवातीला राफेल प्रकरणी सुनावणी फेटाळली होती. त्यानंतर कोर्टात फेरविचार याचिका दाखल केल्यानंतर कोर्टाने सुनावणी करण्यात होकार दिला होता.