इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात रीषभ पंत ला संधी..?

0

बर्मिंघम: रविवारी होणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान होणाऱ्या सामन्याकडे पूर्ण जागांचे लक्ष लागले आहे. भारतासाठी हा सामना अत्यंत महत्वाचा असून आपली विजयी वाटचाल कायम ठेवण्यासाठी हा सामना जिंकणे महत्वाचे आहे. या सामन्यासाठी विजय शंकरच्या ऐवजी रिषभ पंतला संधी दिली जावू शकते. सलग तीन सामन्यात विजय शंकर आपली कामगिरी दाखवू शकला नाही.

आतापर्यंत २०१९ च्या वर्ल्डकप मध्ये भारताचे ६ सामने झाले असून त्या पैकी संघाने ५ सामने जिंकले आहे. त्यात १ सामना अनिनिर्णीत राहिला आहे. गुणतालिकेत भारताचे ११ गुण असून, दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडला पराभूत करून भारतिय संघ उपांत्य फेरीत धडक मारण्यासाठी संघ तयार आहे. सलामीवीर शिखर धवन, गोलंदाज भुवनेश्वर कुमार हे संघाच्या बाहेर जरी असले तरी संघाच्या कामगिरीवर फारसा परिणाम झाला नसल्याचे दिसून आले आहे.

स्पर्धेत फार्मात असलेला सलामीवीर रोहित शर्माला विंडिजविरुद्धच्या सामन्यात चुकीच्या पद्धतीने बाद ठरवण्यात आले होते. त्यामुळे त्याने नाराजी व्यक्त केली होती. आता इंग्लंडविरुद्धची लढत महत्वाची असून, रोहितला चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. शिखरऐवजी राहुलला संधी मिळाली असून, आतापर्यंत त्याची कामगिरी चांगली झाली आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याला खेळ उंचावावा लागणार आहे.