रस्ते अपघात नुकसान भरपाईत वाढ

0

नवी दिल्ली : रस्ते अपघातग्रस्तांना मिळणाऱ्या भरपाईची रक्कम १० टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुर्घटनेत किरकोळ किंवा गंभीर जखमी, अपंगत्व, मृत्यूमुखी पडलेल्यांना १० टक्के जास्त नुकसान भरपाई मिळू शकणार आहे. २४ वर्षांनंतर नुकसान भरपाईची रक्कम वाढविण्याचा निर्णय वाहतूक विभागाकडुन घेण्यात आला आहे. हा नवा मोटार नियम लवकरच लागू होणार आहे. त्यानुसार रस्ते अपघात दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपये दिले जाणार आहेत.

अशी मिळणार मदत

अपंगत्व आलेल्यांसाठी ५० हजार ते ५ लाख रुपयांपर्यंत रक्कम दिली जाणार आहे. यामध्ये दरवर्षी ५ टक्क्यांनी वाढ करण्याचेही प्रावधान आहे. देशात दरवर्षी १.५ लाख जण रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात तर ५ लाखाहून अधिकजण जखमी होतात. वाहन मालकासाठी थर्ड पार्टी प्रिमियममध्ये वाढ करण्यात येणार आहे. सध्याच्या वाहन कायद्याअंतर्गत अपघाती मृत्यूमुखी पडल्यास ५० हजार रुपये तर कायम विकलांगतेस २५ हजार रुपये देण्यात येतात.