महाबळ परिसरात सेवानिवृत्त नायब तहसीलदाराचे घर फोडले
जळगाव : सेवानिवृत्त नायब तहसीलदाराच्या बंद घर फोडून ऐवज घेवून पळून जाणार्या चोरट्यांना हटकले असता, चोरट्यांनी शेजारच्या तरुणावर कोयता उगारला, कोयताचा धाक दाखवून चोरटे पसार झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी महाबळ परिसरातील पारिजात कॉलनीत समोर आली आहे.
महाबळ परिसरातील पारिजात कॉलनीत सेवानिवृत्त नायब तहसीलदार रोहिदास पौलाद निकम हे कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. निकम हे आपल्या कुटुंबियांसह दोन दिवसांपूर्वी पुणे येथे गेले आहेत. बाहेरगावी गेल्याने घरात नेहमी तळमजल्यावरील भाडेकरू स्वप्नील संजय राजपूत हे झोपण्यास येत असत. मात्र शुक्रवारी स्वप्नील हे चाळीसगाव येथे कामानिमित्त गेल्याने त्यांना येण्यास उशिर झाला. त्यामुळे ते खालीच आपल्या घरात झोपले होते.
रिकामे हात परतले चोरटे
सेवानिवृत्त नायब तहसीलदाराचे घर असल्याने मोठा ऐवज हाती लागेल या अपेक्षेने शनिवारी भल्या पहाटे 3 वाजेनंतर चोरट्यांनी निकम यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील आतील कपाटातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त फेकले. यानंतर कपाटाचे बंद लॉकरही तोडल, एवढेच नव्हे तर चोरट्यांनी स्वयंपाक खोलीतील डबेदेखील तपासले. मात्र चोरट्यांच्या हाती काहीच लागल्याने रिकामे हाते चोरटे आल्या त्या पावलांनी परतले. परततांना निकम यांचे भाडेकरुन यांनी चोरट्यांना हटकले असता, चोरट्यांनी त्यांच्यावर कोयता उगारला, व धाक दाखवून चोरटे पळून गेले. घटनेची माहिती कळताच रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या क र्मचार्यांनी पारिजात कॉलनीत पाहणी केली. पोलिसांनी निकम यांच्याशीही संपर्क साधला होता.