झिम्बाब्वे पहिले पंतप्रधान रॉबर्ट मुगाबेचे निधन

0

सिंगापूर: झिम्बाब्वे पहिले पंतप्रधान रॉबर्ट मुगाबे यांचे आज सकाळी निधन झाले आहे. ते ९५ वर्षाचे होते. सिंगापूरच्या एका रुग्णालयात त्यांनी अखेरचे श्वास घेतले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते, त्यांच्यावर उपचार सुरु होते. रॉबर्ट मुगाबे यांचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ झिम्बाब्वेच्या नागरिकांना कायम लक्षात राहणार आहे. मला पंतप्रधान पदावरून कोणीही हटवू शकत नाही. केवळ परमेश्वरच मला माझ्या पदावरून दूर करू शकतात असा दावा ते करायचे. मात्र त्यांची सत्ता २०१७मध्ये तेथील लोकांनी उलटवून लावली होती.