शेतकऱ्यांच्या विद्युत पुरवठा संबंधित प्रश्नांवर रोहिणी खडसे यांनी धारण केला रुद्रावतार

मुक्ताईनगर. प्रतिनिधी

सध्या खरिप पुर्व कपाशी लागवड सुरू असुन ऊन तापत असल्याने पिकांची लाहीलाही होत आहे यातच शेती पंपांचा विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्या कारणाने शेतकरी बांधव त्रस्त झाले आहेत

तालुका भरातील शेतकरी विद्युत वितरण कंपनी च्या समस्या रोहिणी ताई खडसे यांच्या कडे मांडत आहेत

हि बाब गांभीर्याने घेऊन आज कार्यकारी अभियंता ब्रजेश गुप्ता यांचे ऑफिस गाठून शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर रुद्र अवतार धारण केला

शेतकऱ्यांना कृषी पंपास विद्युत पुरवठा योग्य वेळी व योग्य दाबाने होत नाही, शेतकरी बांधवांच्या समस्या निकाली काढण्याची मागणी केली

यावर कार्यकारी अभियंता ब्रिजेश गुप्ता यांनी निमखेडी येथील डी पी उद्याच लावण्यात येईल असे आश्वासन दिले तसेच इतर प्रश्न सुद्धा लवकरात लवकर सोडविण्यात येतील असे सांगितले

यावेळी विद्युत वितरण कंपनी चे अभियंता स्वामी, ढोले ,प्रविण पाटील, बापू ससाणे, प्रदिप साळुंखे,बबलू सापधरे ,संजय कोळी, चेतन राजपूत, रउफ खान, भैय्या पाटील ,हाशम शहा, मुश्ताक भाई, फिरोज भाई,योगेश पाटील, पांडुरंग नाफडे उपस्थित होते.