मुंबई- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात आज चौथा एकदिवसीय सामना खेळला जात आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत वेस्ट इंडीज संघासमोर धावांचा डोंगर उभारला आहे. या सामन्यात लक्षणीय खेळी केली ती रोहित शर्माने त्याने घरच्या मैदानावर दीड शतकीय खेळी केली आहे. १३७ चेंडूत १६२ धावा त्याने ठोकले आहे.
घरच्या शतक झळकावण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. काही जणांचे हे स्वप्न पूर्ण होते, तर काही जणांच्या नशिबी ते नसते. पण भारताचा सलामीवीर रोहित शर्माच्या नशिबीत ही गोष्ट होती. कारण वेस्ट इंडिजविरुद्धचा चौथा एकदिवसीय सामना मुंबईत खेळवला गेला. या सामन्यात रोहितने नेत्रदीपक फटकेबाजी करत शतक साकारले. या शतकानंतर रोहितने जे काही सेलिब्रेशन केले ते पाहण्यासारखेच होते.