रोहित-राहणेची धडाकेबाज फलंदाजी; विक्रमाला गवसणी !

0

रांची: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना खेळला जातो आहे. आज सामन्याचा दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु आहे. काल सामन्याच्या सुरुवातीलाच भारतीय संघाचे दयनीय अवस्था झाली होती. ३ बाद ३९ अश्या अवस्थेत भारतीय संघ होती. संघाला रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेने सावरले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 185 धावांची भागीदारी करताना संघाला दोनशेपल्ल्याड पल्ला गाठून दिला. रोहित – अजिंक्यनं चौथ्या विकेटसाठी सर्वोत्तम भागीदारी नोंदवली. चौथ्या विकेटसाठी सर्वोत्तम भागीदारी करण्याचा विक्रम मोहम्मद अझरुद्दीन आणि मोइंदर अमरनाथ ( 190 वि. इंग्लंड, 1985) यांच्या नावावर होता. तो विक्रम आज रोहित व अजिंक्यनं मोडला.

एकाच सामन्यात मुंबईच्या दोन फलंदाजांना शतक झळकावण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2007मध्ये वसीम जाफर आणि सचिन तेंडुलकर यांनी बांगलादेशविरुद्ध ढाका कसोटीत शतक झळकावले होते. त्यानंतर मुंबईच्या खेळाडूंचा मान रोहित व अजिंक्यने पटकावला. अजिंक्यनं गेल्या दोन वर्षांत भारतीय संघ अडचणीत असताना शतक झळकावले आहे. गतवर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघाची अवस्था 3 बाद 25 अशी होती आणि तेव्हाही अजिंक्यनं शतक ठोकले होते.

रोहित 164 चेंडूंत 14 चौकार व 4 षटकार खेचून 117, तर अजिंक्य 135 चेंडूंत 11 चौकार व 1 षटकार खेचून 83 धावांवर खेळत आहे. भारताने पहिल्या दिवशी 3 बाद 224 धावा केल्या होत्या. त्यात दुसऱ्या दिवशी ते आणखी भर घालत आहेत. दरम्यान या जोडीने12 वर्षांनंतर एक पराक्रम करून दाखवला.

रोहित शर्मानंतर कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्यने कसोटीत शतक झळकावले. कसोटी क्रिकेटमधील त्याचे हे 11 वे शतक ठरले. विशेष म्हणजे रहाणेनं सर्वाधिक 3 शतके ही आफ्रिकेविरुद्ध झळकावली आहेत. त्यानंतर न्यूझीलंड (2), श्रीलंका (2), वेस्ट इंडिज (2), ऑस्ट्रेलिया (1) आणि इंग्लंड (1) यांचा क्रमांक येतो.