मँचेस्टर: वर्ल्डकप स्पर्धेत भारत-पाकिस्तान या दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी संघामध्ये आज मँचेस्टरमध्ये सामना सुरु आहे. नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. हा निर्णय भारतीय संघाने चुकीचा ठरविल्याचे दिसते. भारताकडून रोहित शर्मा आणि के.एल.राहुलने सलामी दिली. रोहित आणि के.एल.राहुलने दमदार सुरुवात करून दिल्यानंतर भारताची स्थिती भक्कम झाली आहे. रोहित शर्माने १४० (११३ चेंडू) धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याला लोकेश राहुलने उत्तम साथ दिली. त्याने ५७ धावा केल्या.