रोहित शर्माचा आणखी विक्रम; ओलांडला १० हजार धावांचा टप्पा !

0

माऊंट मोनगानुई- भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात एकदिवसीय मालिका सुरु आहे. मालिकेतील आज तिसरा सामना आहे. पुन्हा एकदा गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने यजमान न्यूझीलंडच्या संघाला २४३ धावांवर रोखले आहे. या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना शिखर धवनने आक्रमक सुरुवात केली. मात्र 39 धावा असताना तो माघारी परतला. रोहित शर्माने एका बाजूने संयमी खेळी केली. रोहित २१ धावांवर असतांना एक विक्रम नावावर केला.

त्याने लिस्ट ‘अ’ क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा पल्ला पार करण्याचा पराक्रम केला. भारताकडून लिस्ट अ’ क्रिकेटमध्ये सर्वात जलद १० हजार धावा करणारा तो चौथा फलंदाज ठरला आहे. या क्रमवारीत विराट कोहली २१९ डावांसह आघाडीवर आहे, तर सौरव गांगुली २५२ आणि सचिन तेंडुलकर २५७ अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आहेत. रोहितला हा पल्ला गाठण्यासाठी २६० डाव खेळावे लागले.