रोहित शर्माने लेकीचे केले नामकरण; हे ठेवले नाव !

0

मुंबई : भारताचा धडाकेबाज सलामीचा फलंदाज रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिकाला ३० डिसेंबरला कन्यारत्न झाले. रोहित ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असल्याने मुलीच्या जन्मावेळी उपस्थित नव्हता, मात्र आता चौथ्या कसोटी सामन्यात खेळत नसल्यामुळे रोहितने थेट मुंबई गाठली. रोहित आपल्या कन्येचे नामकरण केले आहे. ‘समायरा’ असे मुलीचे नाव ठेवण्यात आले आहे.