मुंबई – भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज रोहित शर्माची पत्नी रितीका साजदेहने ३० डिसेंबरला गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र त्यावेळी रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून विश्रांती घेत भारतात परतल्यावर रोहित शर्माने आपल्या मुलीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
अतिशय गोंडस अशी ही मुलगी असून नेटीझन्सकडून रोहित शर्मा व त्यांच्या पत्नीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.