आफ्रिकेविरुद्ध रोहितची विक्रमाला गवसणी !

0

विशाखापट्टणम: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे. पहिल्या सामन्यात दोन्ही संघाने साजेशी कामगिरी केली आहे. मात्र भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज रोहित शर्माने एक अनोखा विक्रम केला आहे. एका कसोटीत सर्वाधिक 9 षटकार खेचणारा रोहित हा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने नवज्योत सिंग सिद्धूचा 1994 सालचा 8 षटकारांचा विक्रम मोडला. भारताकडून तीनही फॉरमॅटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम रोहितच्या नावावर झाला आहे. रोहितने वन डेत 2013मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 16, तर ट्वेंटी-20त 2017मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 10 षटकार खेचले आहेत.

भारताच्या पहिल्या डावातील 7 बाद 502 धावांच्या प्रत्युत्तरात आफ्रिकेने 431 धावा केल्या. भारताने 71 धावांच्या आघाडीसह दुसऱ्या डावाची सुरुवात केली. मात्र, दुसऱ्या डावात रोहित-मयांक जोडीला साजेशी सुरुवात करता आली नाही. मयांक अवघ्या 7 धावा करून माघारी परतला आणि भारताला 21 धावांवर पहिला धक्का बसला. त्यानंतर रोहितनं खिंड लढवत भारताला अर्धशतकी पल्ला पार करून दिला. त्यावेळी रोहितने षटकार ठोकत विक्रम केला.