धरणगाव (प्रतिनिधी) : सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील कुळवाडी भूषण, मानव प्रतिपालक, विश्ववंदनीय छत्रपती शिवरायांच्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून धरणगावात ‘शिवजयंती उत्सव’ मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात संपन्न झाला. या निमित्ताने शहरातून मासाहेब जिजाऊ यांच्या सजीव देखाव्यात गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्रिंसीपल सौ.वैशाली पवार जिजाऊंच्या रुपात तर बाल शिवाजीच्या सजीव देखाव्यात पहिलीचा विद्यार्थी रोनीत रवींद्र बाविस्कर या दोघांनी धरणगावकरांचे लक्ष वेधून घेतले होते. बाल शिवाजी रोनित बाबत सर्वत्र कौतुक होते आहे. या मिरवणूकीत शहरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शोभायात्रा बालाजी मंदिर – महात्मा फुले स्मारक – कोट बाजार – लाल बहादूर शास्त्री स्मारक – लांडगे गल्ली – परिहार चौकातून येत छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ समारोप झाला. शिस्तबद्ध संचल, महिलांची लक्षणीय उपस्थिती, विविध देखाव्यांची आरास, युवकांचा उत्साह व सहभाग, मुलांपासून आबालवृद्धांचा सहभाग यामुळे उत्सवाची शोभा वाढली.