मोफत नेत्र शस्त्रक्रिया शिबीरामुळे पालकांच्या डोळ्यात आले आनंदाअश्रू

0

रोटरी क्लब जळगाव, पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान व जळगाव पीपल्स बँक संचालित शाहू महाराज रूग्णालय यांचा संयुक्तिक उपक्रम ; 53 डोळ्यांच्या तिरळेपणाच्या व 5 डोळ्यांवर पापणी पडण्याच्या शस्त्रक्रिया

जळगाव : येथील रोटरी क्लब जळगाव, पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान व जळगाव पीपल्स बँक संचालित शाहू महाराज रूग्णालय यांच्यातर्फे आयोजित दोन दिवसीय मोफत नेत्र शस्त्रक्रिया शिबीरात 58 डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. याप्रसंगी भावना व्यक्त करतांना रूग्णांच्या पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले.

समारोप प्रसंगी रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ.चंद्रशेखर सिकची, माजी सहप्रांतपाल डॉ.जयंत जहागिरदार, पुणे नेत्र सेवा प्रतिष्ठानचे डॉ.मधुसुदन झंवर, डॉ.राजेश पवार, डॉ.शामकांत कुळकर्णी, रोटरीचे मानद सचिव कॅप्टन मोहन कुळकर्णी, प्रकल्प प्रमुख व मेडिकल कमेटी चेअरमन डॉ.तुषार फिरके, शाहू महाराज हॉस्पिटलचे प्रशासन प्रमुख संतोष नवगाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी रोटरी क्लबचे संदीप शर्मा, जितेंद्र ढाके, किशोर तलरेजा, दिलीप जैन, सुभाष अमळनेरकर, राजु आडवाणी, डॉ.आदित्य जहागिरदार यांच्यासह सर्व रोटरी सदस्यांनी परिश्रम घेतले.

शस्त्रक्रिया करणार्‍या डॉक्टरांचा सत्कार
या शिबीरात 53 डोळ्यांच्या 96 स्नायूंवर तिरळेपणाच्या व 5 डोळ्यांवर पापणी पडण्याच्या शस्त्रक्रिया करणार्‍या डॉ.झंवर, डॉ.पवार, डॉ.कुळकर्णी यांच्या सह डॉ.राजेंद्र लाहोरे, डॉ.अमर शहा, डॉ.मनोज भायगुडे, डॉ.महेश गडचे, डॉ.अनिल वायकोळे, डॉ.ललीत शहा, डॉ.संजीव राठोड, डॉ.प्रविण जगताप, डॉ.गणेश बांदर, डॉ.हेमंत बाविस्कर, डॉ.निखील चौधरी, डॉ.प्रियंका अल्टे, डॉ.निकुंज गुजराथी, डॉ.अनिकेत आंबेकर, डॉ.मंजिरी मोहीते, डॉ.पल्लवी आंबेकर, आदिंचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच शिबीरास सहकार्य करणार्‍या शाहु महाराज हॉस्पीटलचे संतोष नवगाळे, सुनिता सिसोदिया, बिंदू भारद्वाज, शितल मराठे, अरूण पवार, शांताराम राखुंडे, श्रद्धा घाडगे, पुरूषोत्तम तायडे, योगेश पाटील, अभिषेक पाटील, राजेश पाटील, दिनेश पाटील आदिंचा सत्कार करण्यात आला.

सर्व डॉक्टर्स व रोटरी क्लबला धन्यवाद
सर्व रूग्णांच्या प्रकृती विषयी डॉ.चंद्रशेखर सिकची, डॉ.शशिकांत गाजरे, डॉ.सुनिल सुर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. रूग्णांचे पालक लीना सोनार, सुरेश पाटील (एरंडोल), सौ.शोभा पाटील यांनी अश्रुंना मोकळी वाट करून देत सर्व डॉक्टर्स व रोटरी क्लबला धन्यवाद व्यक्त करीत आमच्या हातमजुरी करणार्‍या गरीबांचे मुले-मुली या मोफत शस्त्रक्रियेमुळे सार्वजनिक ठिकाणी आत्मविश्वासाने जाऊ शकतील असा विश्वास व्यक्त केला. डॉ.मनोज भायगुडे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ.सिकची व डॉ.कुळकर्णी यांनीही संवाद साधला. रोटरीचे जेष्ठ सदस्य छबीलदास शहा यांचे शिबीरास विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले.