आरसीबीसाठी आज ‘करो या मरो’ची स्थिती !

0

नवी दिल्ली: यंदाच्या आयपीएल हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ सर्वात खराब कामगिरी करणारा संघ ठरला आहे. आतापर्यंत ८ सामन्यांतील ७ सामने गमावणारा विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघासाठी आजचा सामना ‘करो या मरो’ सारखा आहे. या स्पर्धेतील स्थान टिकवून ठेवण्यासाठी बेंगळुरूला आज कोलकाता नाईट रायडर्सवर कोणत्याही परिस्थितीत मात करावेच लागणार आहे.

कोलकाता सलग तीन सामन्यांमध्ये पराभूत झाला आहे. गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावरून सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. त्यामुळं कोलकाताला नमवून स्पर्धेतील आव्हान कायम राखण्याची मोठी संधी बेंगळुरूकडे आहे. कोलकाताचा स्फोटक फलंदाज आंद्रे रसेल जखमी असल्याने खेळू शकणार नाही. चेन्नईविरुद्धच्या सामन्यातही तो पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता. त्यामुळं पहिल्यांदाच चांगली कामगिरी करण्यात तो अपयशी ठरला होता. रसेलनं बेंगळुरूविरुद्ध मागील सामन्यात १३ चेंडूंमध्ये ४८ धावा कुटल्या होत्या. त्या जोरावर २०६ धावांचे आव्हान गाठले होते.