जयपूर :- आयपीएलचा यंदाचा हंगाम अगदी शेवटच्या साखळीमध्ये आज बंगळुरू आणि राजस्थान यांच्यादरम्यान होणारा सामना हा दोघांना महत्वाचा असणार आहे. स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी हा सामना जिंकणे दोन्ही संघांना अनिवार्य आहे. त्यामुळे दोनही संघ तयारीने मैदानात उतरतील.
राजस्थान आज आपल्या घरच्या मैदानावर सामना खेळणार जाणार असून त्यांना बंगळुरूविरुद्ध रणनीती आखणे त्यांच्यासाठी अधिक सोपे जाणार आहे. त्यासाठी राजस्थान ‘मास्टर प्लॅन’करून हा सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरतील. राजस्थानचा गोलंदाज जयदेव उनाडकट म्हणाला की, बंगळुरूचा संघ हा त्याच्या कर्णधाराप्रमाणेच निर्भीड असून कोणतीही भीड न ठेवता ते मैदानावर खेळतात. मात्र आज आम्ही त्यांच्यावर हल्ला करण्यास तयार आहोत. कारण आम्ही आमच्या घरच्या मैदानावर खेळणार आहोत. घरच्या मैदानाचा आम्हाला पुरेपूर अनुभव आहे आणि त्याचा आम्ही फायदा करून घेणार आहोत. त्यामुळे आम्हाला बंगळुरूला हरवणे तुलनेने सोपे जाणार आहे, असा विश्वास त्याने व्यक्त केला.