RTOच्या निवडीबाबत सरकारने सर्वोच्च न्यायालयात जावे; धनंजय मुंडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0

मुंबई – राज्यातील 833 मोटार वाहन निरीक्षकांची निवड मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल केली आहे. त्यामुळे एमपीएससी परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेल्या 833 परीक्षार्थी आणि भावी मोटार वाहन निरीक्षकांवर अन्याय झाला आहे. दरम्यान राज्य सरकारने 833 मोटार वाहन निरीक्षकांच्या बाजुने सर्वोच्च न्यायालयात अपील करावे, अशी मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केली आहे. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही मुंडे यांनी आपल्या ट्विटरवरुन सांगितले आहे.

निवड रद्द झालेले सर्व विद्यार्थी अभियांत्रिकी शाखेचे होते. शासन व आयोगाचा भोंगळ कारभार या विद्यार्थ्यांचे भवितव्य उद्ध्वस्त करणारा ठरला आहे.