विद्यार्थी वाहतूक करणार्‍या 285 ऑटो रिक्षांसह 96 टाटा मॅजिक वाहने ताब्यात

0

बैठकीत ठरल्यानुसार नियमांचे पालन नाही ; केवळ कायदेशीर प्रवासी वाहनेच रस्त्यावर : शाम लोही

जळगाव :- विद्यार्थी वाहतूक करणार्‍या संघटनांसह वाहनधारकांच्या बैठकीत नियंमाचे पालन करावे, विना परवाना वाहनांमधुन विद्यार्थी वाहतूक थांबावी याबाबत चालकांना सुचना करण्यात आल्या होत्या. 31 जुलै पर्यंत मुदत देवूनही चालक व मालकांकडून नियमांचे उल्लंघटन होत असल्याने उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे मोहित हातात घेण्यात आली आहे. गुरुवारी या मोहिमेत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांच्या मार्गदर्शनाखाली 285 ऑटोरिक्षांसह 96 टाटा मॅजिक वाहने ताब्यात घेण्यात आली आहे. तर दुसरीकडे अर्ज केला असून रजिस्ट्रेशनची अडचण असल्याने तसेच परवान्यासाठी 3 हजार रुपयांपर्यंत लाच मागितली जात असल्याने परवाने काढायचे कुठून असा आरोप शाळकरी वाहतूक करणार्‍या टाटा मॅजिक वाहन संघटनेतर्फे करण्यात आला आहे.

नियम पूर्ततेसाठी 31 जुलै अखेरची दिली होती मुदत
शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतुक करण्यास खासगी वाहनांना कायदेशीर परवानगी नसतांना मारुती ओम्नी आणि टाटा मॅजिक या छोट्या व्हॅनद्वारे शाळकरी विद्यार्थी वाहतुक सुरु होती. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी जुन महिन्यात विद्यार्थी वाहतुक करणार्‍या वाहनधारकांची बैठक घेतली होती. रिक्षा चालकांनी नियंमाचे पालन करावे ,विना परवाना वाहनांमधुन विद्यार्थी वाहतूक थांबावी यावर उपप्रादेशीक अधिकारी, ऑटोरीक्षा, टाटा मॅजिक चालक, विद्यार्थी वाहतुकदार अशांच्या या संयुक्त बैठकीत चर्चा होवून त्यावर 31 जुलै अखेरची मुदत देवून अशा वाहन धारकांबाबत कठोर निर्णय न घेता रोजगाराच्या दृष्टीने अशा वाहनांना कंत्राटी परवाने देण्या बाबत उपप्रादेशीक परिवहन अधिकारी शाम लोही यांनी मार्ग काढला होता. संबधीत वाहन धारकांना जुलै अखेर सर्व वाहनधारकांनी परवाने घेण्याचे संघटना पदाधिकारी आणि वाहन धारकांनी कबुल केले होते. जुलै नंतर ऑगस्ट आणि आता सप्टेंबर महिना सुरु झाल्याने उपप्रादेशीक परीवहन विभागाने मोहिम हाती घेवून 285 ऑटो रिक्षा 96 टाटा मॅजिक वाहने जमा करण्यात आली आहेत.

तीस रिक्षांवर बुलडोजर
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देषानुसार पंधरा वर्षापेक्षा जुने वाहन स्क्रॅप करण्याचे आदेश आहेत, त्यानुसार शहरातून जुलै महिन्यात तपासणी दरम्यान 30 ऑटो रिक्षा कुठल्याही परवान्या शिवाय, परमिट नसलेल्या आणि विशेष म्हणजे, चेसिस कुठले..बॉडी कुठली अशा अल्टर करुन तयार केलेल्या बेकादेशीर ऑटोरिक्षाही आढळून आल्या होत्या.या सर्व 30 बेकादेशीर रिंक्षावर अक्षरश: जेसीबी फिरवुन तीन तुकडे करुन नष्ट करण्यात आल्या आहेत.

जी-फार्म’ मुळे अडचण

विद्यार्थी वाहतुकीसाठी अधिकार्‍यांनी सुचवल्या प्रमाणे 51 टाटॉ मॅजिक व व्हॅन साठी आम्ही परवाने मिळवण्यासाठी अर्ज करुन पावत्या फाडल्या आहेत. मात्र ऑनलाईन रजिष्ट्रेशनची अडचण…एंजट कडून जादा रकमेची मागणी होत आहे. थेट कार्यालयात संपर्क केला तर कामे होत नाही. संबधीता कडून 3 हजार प्रत्येकी जी-फार्म’ अर्थात लाच मागीतली जाते. वाहन चालक देणार कोठून. – भरत वाघ, विद्यार्थी वाहतूक, टाटा मॅजिक वाहन संघटना

बेकायदा वाहन नकोच
शाळकरी मुलांना बेकायदा वाहनातुन वाहतुक करू देणार नाही. प्रवासी वाहतुक रिक्षा धारकांनीही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई करणारच, गेल्या वेळेस आपण संधी देऊन रोजगार हिरावुनये म्हणुन अशा वाहन धारकांना रिक्षा स्क्रॅप साठी 15 वर्षाची अट शिथील करून दिली, बेकादेशीर वाहने मात्र खपवली जाणार नाहीत. – शाम लोहीउपप्रादेशीक परिवहन अधीकारी