जळगाव – जय रिक्षाचालकांनी जळगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून वाहतुकीसाठी परवाना घेतला आहे त्या सर्व ऑटो रिक्षा चालकांना परवाना अटी प्रमाणे प्रवासी वाहतूक करताना मीटरप्रमाणे भाडे घेणे बंधनकारक आहे. यामुळे रिक्षांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली असून आतापर्यंत 98 रिक्षाचालकांकडून 67 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
रिक्षाचालकांनी विना मीटर प्रवासी वाहतूक केली तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोणी यांनी दिला आहे.
विना स्पेअर मिटर किंवा मीटर नादुरुस्त असताना प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि शहर वाहतूक शाखेच्या संयुक्त पथकाने तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत 9 नोव्हेंबर पासून आतापर्यंत 98 रिक्षाचालकांकडून 67 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.