मुंबई । डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला आहे. रुपयाच्या किमतीत विक्रमी घसरण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाने 67 चा टप्पा पार केला आहे. रुपयाची किंमत सध्या 67 रुपये 13 पैसे प्रती डॉलरएवढी झाली आहे. शुक्रवारी 66 रुपये 86 पैशांवर रुपया बंद झाला होता. याचा सर्वात जास्त फटका बसणार आहे तो आयातदारांना. कारण एका डॉलरसाठी आता अधिक रुपये मोजावे लागणार आहेत. देशाच्या परकीय चलनातही यामुळे काही प्रमाणात घट होणार आहे.
फेब्रुवारीमध्ये रुपया 67 च्या पार झाला होता. 7 मे रोजी रुपयाची किंमत 67.13 रु. प्रती डॉलर इतकी झाली आहे. खनिज तेलाचे भाव वाढले, पश्चिम आशियामधल्या तणावाचा परिणाम यामुळे रुपया घसरला आहे. पुढील काही काळासाठी रुपयाची घसरण चालू राहण्याची शक्यता आहे.