नवी दिल्ली- डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन असलेल्या रुपयात घसरण सुरूच आहे. घसरण गेल्या काही दिवसांपासून थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चिन्ह आहे. आज रुपयाच्या घसरणीच्या बाजाराची सुरुवात झाली. डॉलरच्या तुलनेत रुपया २१ पैसे खाली जाऊन ७०.९५ रुपयावर पोहोचला आहे. आज पर्यंतचा हा सर्वाधिक नीचांक आहे. गुरुवारी ७०.९० वर रुपया होता.
कच्च्या तेलाच्या किंमतीत होणारी वाढ यामुळे रुपयाचे घसरण सुरु आहे.