मास्को-रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन पुन्हा लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. ऑलम्पिक जिम्नास्ट खेळाडू असलेल्या एलीना काबायेवा यांच्याशी ते लग्न करणार असल्याची चर्चा आहे.
एलीना काबायेवा दोन वेळा ऑलम्पिक पदक विजेत्या ठरलेल्या आहेत. १२ वेळेस वर्ल्ड चॅम्पियन राहिलेल्या आहेत. २५ वेळा यूरोपीयन चॅम्पियन ठरलेल्या आहेत. एलीना ३० वर्षाची आहे. माध्यमातून त्यांच्या संबंधाविषयी खूप चर्चा सुरु आहे. २००४ पासून एलीना पुतिन यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे.