Russia-Ukraine War in Marathi : रशियाने- युक्रेन युद्ध सुरु होऊन २४ तास उलटले आहेत. याचा परिमाण जागतिक पतीलीवर दिसू लागला आहे. कारण जग रशियासमर्थक आणि विरोधक अशा दोन गटांमध्ये विभागले गेले आहेत.
त्यातच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवरुन चर्चा करुन चर्चेने प्रश्न सोडवण्याचं आवाहन केलंय. तर दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे कालपासून रशिया दौऱ्यावर आहेत. या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरच आंतरराष्ट्रीय विषयांमधील जाणकार असलेल्या एका रशियन तज्ज्ञाने रशिया-युक्रेन संघर्षाची तुलना भारत-पाकिस्तान संबंधांशी केलीय.