व्लादिवोस्तोक: पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी भारत आणि रशियामधील विविध विषयांवर चर्चा होत आहे. दरम्यान रशियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. भारतासाठी ही मोठी अभिमानाची बाब आहे. याबाबत मोदींनी रशियाचे आभार मानले आहे. यापूर्वी देखील मोदींना विविध देशाचे सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळालेले आहे. आठवड्याभरापूर्वी मोदींचा संयुक्त अरब अमिराती (यूएई)ने सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला होता. त्यानंतर आता मोदींना रशियाचा सर्वोच्च पुरस्कार जाहीर झालेला आहे.