नवी दिल्ली: मोदी सरकार 2 मध्ये परराष्ट्रमंत्री म्हणून एस.जयशंकर यांची निवड करून मोदींनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. दरम्यान एस.जयशंकर यांनी काल सोमवारी भाजपमध्ये औपचारिकरीत्या प्रवेश केला. त्यांना आता गुजरातमधून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसऱ्या जागेसाठी जुगलजी माथुरजी ठाकोर हे उमेदवार आहेत.
राजनैतिक अधिकारी म्हणून कारकीर्द घालवलेले आणि माजी परराष्ट्र सचिव असलेले जयशंकर यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात परराष्ट्र व्यवहारमंत्री म्हणून समावेश केला होता. ३० मे रोजी इतर मंत्र्यांसोबत त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली होती.