नवी दिल्ली: कॅफे कॉफी डेचे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह नेत्रावती नदीमध्ये सापडला आहे. ते सोमवारपासून बेपत्ता होते. दरम्यान त्यांच्या जागी कॅफे कॉफी डेच्या अंगामी अध्यक्षपदी एस.व्ही.रंगनाथ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीची पुढील बैठक ८ ऑगस्टला होणार आहे. त्यापूर्वी ही नियुक्ती करण्यात आली आहे. व्ही. जी. सिद्धार्थ हे कॅफे कॉफी डेचे संस्थापक, मालक आणि भाजपा नेते माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांचे जावई होते.