सब का साथ…फिर भी जळगाव भकास..!

0

रस्त्यावर पडलेल्या खड्यांवर रांगोळ्याच्या पायघड्या टाकून शिवसेनेचे अनोखे आंदोलन

जळगाव: जळगाव शहरातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. ’रस्त्यात खड्डे की, खड्यात रस्ते’असा प्रश्न उपस्थित होत आहे. खड्डयांमुळे दररोज अपघात होत असतांना सत्ताधार्‍यांसह मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सब का साथ…फिर भी जळगाव भकास…’ अशा घोषणाबाजी करत आणि रस्त्यावर पडलेल्या खड्यांवर रांगोळ्याच्या पायघड्या टाकून अनोखे आंदोलन केले.

मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष

शहरातील प्रमुख रस्त्यांसह उपनगरातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे जळगावकरांना रस्त्यावरून चालताना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्डयांमुळे दररोज अपघात होत आहे. पाठीचे आणि मनक्याच्या आजारात देखील वाढ झाली आहे. तरीही मनपा प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने जळगावकरांमध्ये रोष व्यक्त होत आहे.

सत्ताधार्‍यांनी आश्वासनपूर्ती करावी

मनपाच्या निवडणुकीदरम्यान वर्षभरात शहराचा कायापालट करु असे सत्ताधार्‍यांनी आश्वासन दिले होते.मात्र वर्ष उलटून देखील आश्वासनाची पूर्ती केली गेली नसल्याचा आरोप शिवसनेच्या कार्यकर्त्यांनी केला. दरम्यान,आणण्यासाठी शिवसेना महानगरतर्फे शाहूनगरपासून पिंप्राळा रेल्वे गेटपर्यंत खड्यांवर रांगोळी काढून अनोखे आंदोलन करत निषेध करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे गजानन मालपुरे, निलेश पाटील,मंगला बारी, पृथ्वीराज सोनवणे, आदी पदाधिकारी वकार्यकर्ते उपस्थित होते.