साबुदाण्याची मागणी वाढली , मात्र किंमत घटली

जळगाव – जळगाव शहरात कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर साबुदाण्याची किंमत घटली असून त्याची मागणी मात्र जबरदस्त वाढली आहे.

दरवर्षी कार्तिकी एकादशीला जळगाव शहरात श्रीराम रथ निघतो. यामुळे कार्तिकी एकादशी ला जळगाव शहरात मोठ्या प्रमाणावर नागरिक उपवास करतात. उपवासामुळे जळगाव शहरात साबुदाण्याची मागणी वाढली आहे. शहरात साबुदाण्याची मागणे जरी वाढली असली तरी त्याचे भाव काही वाढले नसून ते सात ते आठ रुपये कमी झाले आहेत.

 

साबुदाणा चे भाव 60 रुपये प्रति किलो होते ते आता 52 ते 53 रुपये झाले आहेत.