सचिन तेंडूलकरला ‘हॉल ऑफ फेम’मध्ये स्थान

0

नवी दिल्ली: क्रिकेट जगतातील देवता अर्थात मास्तर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा समावेश आयसीसीच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज अॅलन डोनाल्ड आणि ऑस्ट्रेलियाची माजी महिला क्रिकेटपटू कॅथरिन यांनाही हा सन्मान देण्यात आला आहे. लंडनमध्ये नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात सचिन, डोनाल्ड, कॅथरिनसह तिघांचा आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला. सचिनच्या आधी भारतामधून हॉल ऑफ फेममध्ये माजी क्रिकेटपटू बिशनसिंग बेदी, कपिल देव, सुनील गावसकर, अनिल कुंबळे यांचा समावेश करण्यात आला होता.