सचिन तेंडुलकरने या अभिनेत्री सोबत केला रोमान्स: अभिनेत्री श्री रेड्डीची खळबळजनक पोस्ट

0

 हैदराबाद-चित्रपटसृष्टीत होणाऱ्या कास्टिंग काऊचविरोधात आवाज उठवत भररस्त्यात टॉपलेस होणाऱ्या अभिनेत्री श्री रेड्डीने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरवर खळबळजनक आरोप केले आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून तिने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर थेट आरोप केले आहेत. श्री रेड्डीने दाक्षिणात्य अभिनेत्री चार्मी कौर हिच्यासोबत सचिनचे नाव जोडले आहे.

श्री रेड्डीने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर सचिन तेंडुलकरला थेट लक्ष्य करत, एक पोस्ट लिहिली. ‘एक रोमॅण्टिक व्यक्ती, ज्याला लोक सचिन तेंडुलकरन म्हणून ओळखतात. तो हैदराबादमध्ये आला असता एका ‘चार्मिंग गर्ल’ने त्याच्यासोबत रोमान्स केला. महान व्यक्ती चांगला खेळ खेळू शकतात, माझा अर्थ चांगला रोमान्स करू शकतात असा आहे,’ असे श्री रेड्डीने लिहिले आहे. या पोस्टमधील ज्या चार्मिंग गर्लचा उल्लेख केला आहे, ती तेलुगू अभिनेत्री चार्मी कौर असल्याचे मानले जात आहे. आता यावर सचिन तेंडुलकर किंवा स्वत: चार्मी कौर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.