मुंबई । सचिन तेंडुलकरने मुंबई गुन्हे विभागात गुन्हा दाखल केला आहे. याची माहिती खुद्द सचिन तेंडुलकर यानेच दिली आहे. सचिन तेंडुलकरने गुरुवारी तक्रार नोंदवली. मुंबई क्राइम ब्रँचच्या सायबर सेलमध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, खोट्या आसचिनचे नाव वापरले जात असल्याचा बनावट जाहिरातींमध्ये आरोप केला आहे. सचिनच्या नावाचा वापर करून लोकांची फसवणूक केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. इंटरनेटवरील अनेक बनावट जाहिरातींमध्ये नावासह फोटो आणि आवाजाचा गैरवापर होत असल्याचा आरोप सचिनने केला आहे. त्याच्या नावाचा वापर करून लोकांची फसवणूक केली जात आहे. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे त्या बनावट जाहिरातींमध्ये असेही म्हटले जात आहे की, जर कोणी त्यांचे प्रॉडक्ट खरेदी केले तर त्यांना सचिन तेंडुलकरची स्वाक्षरी असलेली जर्सी दिली जाईल. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने याबाबत तपास सुरू केला आहे.